मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 31 जुलैला मराठवाड्यात;  संभाजीनगर जिल्ह्याचा करणार दौरा

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठवाड्याच्या दौऱ्यावर येणार आहे. मुख्यमंत्री शिंदे 31 जुलैला औरंगाबाद येथे येणार असल्याची माहिती आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. दरम्यान मुख्यमंत्री शिंदे हे जिल्ह्याभराचा दौराही करणार असल्याचे अब्दुल सत्तार म्हणाले आहे.

मुंबई येथे माध्यमांना माहिती देतांना अब्दुल सत्तार म्हणाले आहे की, 31 जुलैला मुख्यमंत्री माझ्या सिल्लोड मतदारसंघात येणार आहे. सोबतच आमच्या जिल्ह्याचा सुद्धा ते दौरा करणार असल्याचे सत्तार म्हणाले. लाखो लोकं एकनाथ शिंदे यांची वाट पाहत आहे. त्यामुळे मराठवाड्यात आमचा एकही आमदार पडणार नाही अशी ग्वाही आम्ही देतो असेही सत्तार म्हणाले.

 

दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी औरंगाबाद दौरा करत, शिवसंवाद यात्रा काढली होती. यावर बोलतांना अब्दुल सत्तार म्हणाले की, आदित्य ठाकरे हे माझ्या मतदारसंघात आलेच नाही. ते आले नाही म्हणून त्यांना विशेष निमंत्रण आहे की, पुढच्यावेळी तरी या माझ्या गद्दाराच्या मतदारसंघात, असेही सत्तार म्हणाले.

 

एकनाथ शिंदे यांच्या गटात असलेल्या आमदारांपैकी सर्वाधिक आमदार औरंगाबाद जिल्ह्यातील आहे. विशेष म्हणजे ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले संदिपान भुमरे आणि राज्यमंत्री असलेले अब्दुल सत्तार यांनी मंत्रीपद सोडून  बंडखोरी करत शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता.

 निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात शिवसेनेने उचलले पाऊल

देशाच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज घेणार राष्ट्रपतीपदाची शपथ

 

Team Global News Marathi: