हिंदुत्व विचाराच्या रक्षणासाठी राज्यात सत्ता परिवर्तन झाले असून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार भाजपसोबत आले आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पनवेल येथे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत सांगितले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मर्द मराठा आहेत असे विधान त्यांचे तोंडभरून कौतुक सुद्धा केले होते. खासदार श्रीकांत शिंदेंनी फडणवीसांचा हा व्हिडिओ शेअर केला आहे.
भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीत कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण करताना फडणवीसांनी राज्यातील सत्तांतर आणि त्यासाठी शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी घेतलेली भूमिका यासंदर्भात भाष्य केलं. यावेळी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, प्रदेश प्रभारी सी.टी.रवी, सह प्रभारी ओमप्रकाश धुर्वे व जयभान पवैय्या, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रदेश सरचिटणीस आ. श्रीकांत भारतीय आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
एक हिमतीचा मर्द मराठा… शिवछत्रपतींचा मावळा….@mieknathshinde pic.twitter.com/UkUj4YmaEN
— Dr Shrikant Eknath Shinde (@DrSEShinde) July 24, 2022
एक हिमतीचा मर्द मराठा, छत्रपतींचा मावळा म्हणत एकनाथ शिंदेंचं देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केलं. याबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करतो, असे म्हणत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी बंड केलं तेव्हा हे सरकार येईल, असं कुठेही ठरलं नव्हत. त्यामुळे, एवढे लोकं, आमदार सोबत येतील हे त्यांनाही माहिती नव्हतं. कदाचित असंही घडलं असत.
तसेच जर हे सगळे लोकं सोबत नसते आले. तर, एकनाथ शिंदेंचं सामाजिक-राजकीय जीवन आहे, इतक्या वर्षांची पुण्याई समाप्त करण्यात आली असती. पण, त्यांनी याचा विचार केला नाही, त्यांनी हे ठरवलं की मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे, त्यांचा कार्यकर्ता आहे, अशा शब्दात फडणवीसांनी एकनाथ शिंदेंची स्तुती केली. फडणवीसांचा मेळाव्यातील या भाषणाचा व्हिडिओ एकनाथ शिंदेंचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी ट्विटरवरुन शेअर केला आहे. तसेच, एक हिमतीच मर्द मराठी, छत्रपतींचा मावळा असं कॅप्शनही त्यांनी दिलं आहे.
अक्षय कुमार बनला सर्वाधिक कर भरणारा बॉलीवूड अभिनेता
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा पहिला टीझर प्रदर्शित