एकनाश शिंदेजी अभिनंदन, पण.. राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर राज्यातील राजकारणात नव्या चर्चेला उधाण

 

एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 39 आणि 11 अपक्ष असे एकूण 50 आमदारांसह बंड केलं. एकनाथ शिंदे यांच्या या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी घोषणा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिक्रिया यायला सुरूवात झाली. एवढच नाही तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ट्वीट करून एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं. पण शिवसेनेकडून मात्र अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

दरम्यान, आता राज ठाकरे यांची प्रतिक्रिया आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून राज यांनी एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा देत एक इशारा दिला आहे. शिवसेनेकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरूनही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. नेहमीच माध्यमांशी संवाद साधणारे संजय राऊतही शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या घोषणेनंतर अजून काही बोललेले नाहीत.

मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाकरे यांच्याकडूनही काहीच प्रतिक्रिया आली नाही. राज ठाकरे यांचा शिंदे यांना इशारा उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर राज ठाकरे यांनी खोचक टोला लगावला होता. आता मात्र, शिंदे यांनी शुभेच्छा देताना एक इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, की एकनाथ शिंदेजी, आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात. आपले अभिनंदन.

खरंच मनापासून आनंद झाला. नशिबाने आपल्याला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली आहे. आता ती स्वकर्तृत्वाने सिद्ध कराल ही आशा. आपण तरी बेसावघ राहू नका. सावधपणे पावले टाका. पुन्हा एकदा आपले अभिनंदन. दरम्यान, सावध कोणापासून राहा? हे मात्र काही स्पष्ट झालेलं नाही मात्र नव्या चर्चांना उधाण आले आहे.

Team Global News Marathi: