शिंदे -फडणवीस मंत्री मंडळात कोणाला मिळाणार संधी ?

 

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फंडांवीस यांनी काळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण केली मात्र आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कोणाला मंत्री पदावर संधी मिळणार याविषयी अनेक तर्कवित्रक लागले जात आहे समोर आलेल्या माहितीनुसार शिंदे यांच्यासोबत आधीच्या सरकारमधील नऊ मंत्री आहेत. त्यांना पुन्हा मंत्रिपदे दिली जातील असे म्हटले जाते.

माजी मंत्री गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, जयकुमार रावल, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. संजय कुटे, आशिष शेलार, राजेंद्र पाटणी, माधुरी मिसाळ, संभाजी पाटील – निलंगेकर. याशिवाय, कॅबिनेट मंत्रिपदासाठी डॉ. विजयकुमार गावित, किसन कथोरे, सुरेश खाडे, योगेश सागर, रवींद्र चव्हाण यांच्या नावाचा विचारही केला जात असल्याचे सांगितले जाते.

राज्यमंत्री म्हणून राहुल आहेर, डॉ. तुषार राठोड, अतुल सावे, जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले, रणधीर सावरकर, देवयानी फरांदे यांच्या नावांचाही विचार केला जात आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या एकूण सदस्यांची संख्या ४२ इतकी असते. त्यातील चार ते पाच मंत्रिपदे रिक्त ठेवली जावू शकतात. शिंदे यांच्या गटाला १४ ते १५ मंत्रिपदे दिली जातील असे आधी म्हटले जात होते.

तसेच त्यांच्या गटाच्या मंत्रिपदांची संख्या कमी केली जावू शकते. मंत्रिपदासाठी विचार करताना जातीय समीकरणे, मुंबईसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विभागीय संतुलनांचा विचार केला जाईल. एकनाथ शिंदे गटातून विद्यमान मंत्र्यांव्यतिरिक्त आशिष जयस्वाल, बालाजी किणीकर यांना मंत्रिपदे दिली जावू शकतात.

Team Global News Marathi: