एकनाथ खडसेंनी जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचे दिसतेय, ED ची कोर्टात माहिती !

 

मुंबई | पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वार्तावली जात असून या जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणी ईडीने एकनाथ खडसे आणि कुटुंबियांविरोधात चौकशी सुरू केली होती .

 

त्यातच आता ईडीने खडसे याना जोरदार धक्का दणका देत खडसेंच्या ५ कोटी ७३ लाखांच्या मालमत्तेवर अलीकडेच टाच आणली. यानंतर आता प्राथमिकदृष्ट्या पाहता एकनाथ खडसेंनी पुणे जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट दिसत आहे, असे स्पष्ट निरीक्षण ईडी कोर्टाने नोंदवल्याचे सांगितले जात आहे. ED ने लगावलेल्या या आरोपांमुळे खसडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

खडसे हे महाराष्ट्रातल्या सत्ताधारी पक्षाचा भाग आहेत, मात्र हा गुन्हा घडताना ते भाजपमध्ये होते. या गोष्टीकडेही दुर्लक्ष करुन चालणार नाही. एकनाथ खडसे यांनी मंत्रिपदावर असताना पदाचा गैरवापर करत स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांना फायदा करुन दिला. त्यामुळे एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना अशा परिस्थितीत जामीन देता येणार नाही, अन्यथा समाजात वाईट संदेश जाईल, असे ईडी कोर्टाने स्पष्ट केल्याचे सांगितले जात आहे.

Team Global News Marathi: