अभिनेता रजत बेदीच्या कारच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल !

 

“कोइ मिल गया” या चित्रपटात व्हिलनची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता रजत बेदीच्या कारच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या ३९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सोमवारी कामावरुन परत येत असताना रजतच्या गाडीने मुंबईच्या डी एन नगर परिसरात रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला धडक दिली होती.

पुढे रजत बेदीनेच त्याला कूपर रुग्णालयात दाखल केलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी कलम ३०४A अन्वये निष्काळजीपणे एखाद्याच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी रजत बेदीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अभिनेता रजत बेदीविरोधात सुरुवातीला कलम २७९ आणि ३३८ तसंच मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आल्याची माहिती डी एन नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक मिलिंद कुर्डे यांनी दिली होती.

“माझे पती कामावरून परतत असताना सोमवारी संध्याकाळी ६.३० वाजता अंधेरी वेस्ट लिंक रोडवर शीतला देवी मंदिराजवळ ही घटना घडली. अभिनेता रजत बेदी एमएच ०२ सीडी ४८०९ ही आपली कार चालवत होता, त्याने माझ्या पतीला रस्ता ओलांडत असताना धडक दिली. तो खाली पडला, त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला दुखापत झाली आहे. माझ्या पतीला काही झाल्यास रजत बेदी जबाबदार असेल, त्याला अटक करा” अशी मागणी राजेशची पत्नी बबिता दुत यांनी यांनी केली होती.

Team Global News Marathi: