एकमेकांचे नेते-कार्यकर्ते फोडू नका; अंतर्गत वादानंतर हायकमांड यांचे भाजपा-शिंदे गटाला सूचना

 

मुंबई : भाजपा-शिंदे गटा अंतर्गत कुरबुरी सुरु झाल्या आहेत. दोन्ही गट एकमेकांचे नेते फोडत आहेत. भाजपाच्या काही नेते आणि कार्यकर्त्यांनी मुंबईत शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर या अंतर्गत वादाची कुणकुण थेट हायकमांड पर्य पोहचली आहे. एकमेकांचे नेते फोडू नका अशा सूचना भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी दिल्या आहेत. यामुळे दोन्ही गटाचे नेते सतर्क झाले आहेत.

शिंदे-फडणवीस सत्तेत एकत्र असले तरी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गट आणि भाजपच्या जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. स्वत:चा वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न दोन्ही गटांकडून होत आहे. त्यातच भाजपा आणि शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचेही दिसत आहे. राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार अस्तित्वात असले तरी स्थानिक पातळीवर वेगळेच चित्र आहे.

स्थानिक पातळीवरती शिंदे गट आणि भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहे. शिंदे गटाचे नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. तर भाजपचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहेत. भाजप आणि शिंदे गटानं एकमेकाचे नेते-कार्यकर्ते फोडू नये. शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघात घुसखोरी नको अशा सूचना भाजप वरिष्ठ नेत्यांनी मंत्र्यांना दिल्या आहेत. फोडोफाडीचे रुपांतर संघर्षात होऊ नये यासाठी आता थेट भाजप नेतृत्वानेच यात लक्ष घातल्याचे दिसत आहे.

Team Global News Marathi: