“एका पोरामुळे मुंबईच्या पैशाचा चुराडा होतोय, याला.”, निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला

 

मुंबई | मुंबई उच्च न्यायालयाने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा महत्वाकांक्षी असलेल्या प्रकल्पाबाबत मोठा निर्णय दिला आहे. पवई तलाव परिसरातील सायकल आणि जॉगिंग ट्रॅकला मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला असून तेथील बांधकाम पर्यावरण कायद्याचे उल्लंघन करणारे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. आता याप्रकरणी न्यायालयाने महापालिकेला सुनावले आहे. यावरूनच भाजप नेते निलेश राणे यांनी ट्वीट करत टीका केली आहे.

“एका पोरा मुळे मुंबईच्या पैशाचा चुराडा होतोय, याला वाटेल तिकडे काही करत सुटला आहे ज्याची किंमत मुंबईला काही वर्षांनी भरावी लागेल. नाईट लाईफचं नाटक सुरू केलं आज ते नाटक फक्त याच्या मित्रां पुरतच मुंबईत सुरू आहे. दहा फुटाची काम करणार आणि हजार फोटो काढणार पण त्यामागे नुकसान मोठं आहे.”, असे ट्वीट निलेश राणे यांनी केले आहे.

दरम्यान पवई तलाव परिसरातील पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने झालेले बांधकाम तात्काळ तोडून ती जागा पूर्ववत करावी, असे आदेश न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले आहेत. न्यायालयाचा हा निर्णय ठाकरे सरकारला मोठा धक्का म्हटले जात आहे. येन मुंबई मनपा निवडणुकीच्या पर्हस्वभूमीवर न्यायालयाने सुनावल्या खडेबोल सुनावल्यामुळे शिवसेनेची नामुष्की झाली आहे.

Team Global News Marathi: