“‘बदलते हुए मौसमों का भी खयाल रखता हूं, मगर रगो में भी उबाल रखता हूं”, जितेंद्र आव्हाड यांचे सूचक ट्विट

 

ठाणे | मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र महाराष्ट्रात बघायला मिळत आहे. तसेच राजकीय नेत्यांमध्येही आरोप-प्रत्यारोपांच्या मालिका रंगलेल्या बघायला मिळत आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे एक ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे.

जितेंद्र आव्हाड आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत की,’बदलते हुए मौसमों का भी खयाल रखता हूं, मगर रगो में भी उबाल रखता हूं. ए जिंदगी तेरा जो भी मायना हो, तेरे रास्तेपर चलते हुए खुद्दारी का भी खयाल रखता हूं’, असे आव्हाड आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत. matra या ट्विट मधून त्यांनी कोणाला टोला लगावला हे अद्याप गुलदस्त्यात आहे

दरम्यान, यापूर्वी भोंग्याच्या मुद्द्यावरून विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देत जितेंद्र आव्हाड यांनी “आखिर क्यों” या चित्रपटातील एका गाण्याच्या काही ओळी ट्विट केल्या होत्या. ते म्हणाले होते की,’दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है, उम्र भर का गम हमे ईनाम दिया है. तूफाँ में हमको छोड़ के साहिल पे आ गये. दुश्मन न करे दोस्त नेवो काम किया है.’ तसेच मंदिरावरचे भोंगे काढा असे म्हंटल्यानंतरची ही नैसर्गिक प्रतिक्रिया असल्याचेही ते म्हणाले होते. यावरून मनसे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात शाब्दिक चकमक सुद्धा उडालेली पाहायला मिळाली होती.

Team Global News Marathi: