ईडीच्या कार्यालयात आज अनिल परब गैरहजर राहणार वाचा का ?

 

मुंबई | शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नीतीचा बजावली असून आज सकाळी ११ : ०० वाजता चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहे. सचिन वाझे यांनी लागलेल्या १०० कोटी हप्ता वसुलीच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी त्यांना ईडी कार्यालयात बोलावण्यात आले आहे. मात्र परब यांना मंगळवारी चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याबाबत नोटीस बजावली असली तरी ते गैरहजर राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यांच्याकडे कशाबद्दल चौकशी करायची आहे, हे स्पष्ट न केल्याने प्रत्यक्ष हजर न राहता त्याबाबत विचारणा करण्यात येईल, असे समजते.

नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. त्यावेळी रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू असताना राणे यांच्यावर कारवाई करण्याबाबत मोबाइल फोनवरून सूचना करत असल्याची व्हिडिओ क्लिप TV९ या मराठी वृत्त वाहिनीच्या माध्यमातून व्हायरल झाली होती. त्याबद्दल भाजपाने त्यांच्यावर कारवाई आणि सीबीआय चौकशी करण्यासाठी न्यायालयात जाणार असल्याचे जाहीर केले होते.

ईडीने बजावलेल्या नोटीसमध्ये केवळ ‘इन्व्हेस्टिगेशन पार्ट’ इतकेच नमूद करून मंगळवारी सकाळी ११ वाजता कार्यालयात हजर राहावे, असे नमूद केले आहे. त्यांच्याकडे १०० कोटी वसुली प्रकरण व सचिन वाझेने एनआयए कोठडीतून लिहिलेल्या पत्रात बीएमसी कॉन्ट्रॅक्टर्सकडून वसुली करण्याबाबत परब यांनी सूचना केल्याचे नमूद केले आहे.

Team Global News Marathi: