अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसे आक्रमक भूमिकेत

 

ठाणे | सहाय्यक आयुक्तांवर हल्ला झाल्याची ही संतापजनक घटना सोमवारी सायंकाळी घडली आहे. या जीवघेणा हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडलं होत. मात्र या घटनेमुळे अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मनसेने अनधिकृत फेरीवाल्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे.

आज मुंबई, ठाणे सारख्या मोठ्या शहरांमध्ये दिवसेंदिवस फेरीवाल्यांचा विषय हा गंभीर होत आहे. मनसे सातत्याने अनिधिकृत फेरीवाल्यांविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसतीय. त्यातच आता काल ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने हल्ला केल्यानंतर आता पुन्हा मनसे आक्रमक झालेली दिसत आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी कासारवडवली भागात गेल्या असताना त्यांच्यावर एका फेरीवाल्याने जीवघेणा चाकू हल्ला केला. या घटनेत पिंपळे यांच्या हाताचे दोन बोटं कापले गेली आहेत. तर, त्यांच्या अंगरक्षकाचं सुद्धा एक बोट कापलं गेलं. त्यांच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यानंतर आता मनसे मैदानात उतरली आहे.

कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर मनसे तीव्र शब्दात घटनेचा निषेध केला. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट मैदानात उतरून अनधिकृत फेरीवाल्यांचा समाचार घेतला. अनधिकृत फेरीवाल्यांच्या गुंडागर्दीला आळा घालण्यासाठी मनसे नेते महेश कदम यांनी फेरीवाल्यांना दमदाटी केेली आणि रस्ता मोकळा केला.

Team Global News Marathi: