“ED ची धाड किती जणांची झोप उडवेल हे पत्रकार परिषदेपूर्वी शिवसेनेला कळेल”

 

मुंबई | शिवसेनेकडून आज सायंकाळी ४ वाजता एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षविरोधात मोठा गौप्यस्फोट शिवसेना करणार आहे असं बोललं जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते प्रसाद लाड यांनी म्हटलं, भाजप अशा खोट्या धमक्यांना घाबरत नाही. झोप लागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

आज एनआयए आणि ईडीकडून धाडसत्र सुरू आहे त्यामध्ये किती लोकांची झोप उडणार हे संध्याकाळी ४ पूर्वी संजय राऊत यांना कळेल. त्यामुळे संजय राऊत यांनी स्वत:ची झोप वाचवावी. संजय राऊत तोफ आहेत का? प्रसाद लाड यांनी पुढे म्हटलं, माझी आणि संजय राऊत यांची दिल्लीत भेट झाली.मात्र भेटीत राजकीय चर्चा झाली नाही. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेला आम्ही चोख प्रतिउत्तर देऊ. संजय राऊत काय तोफ आहेत का ? आम्ही सुद्धा सक्षम आहोत.

केंद्रीय तपास यंत्रणा आपल्या अधिकानुसार जर कारवाई करत असेल. जर तपास यंत्रणा एखाद्या राजकीय नेत्यापर्यंत पोहोचत असेल आणि तो राजकीय नेता त्या प्रकरणात सहभागी असेल तर माझं म्हणणं आहे की ती तपास यंत्रणा चुकीचं काम करतेय का? यांच्यामाध्यमातून भाजपच्या लोकांना ज्या प्रकारे त्रास देत आहेत, यंत्रणेचा गैरवापर कोण करत आहे हे महाराष्ट्रातील जनता पाहत आहे असंही प्रसाद लाड म्हणाले.

Team Global News Marathi: