जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊनच शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करा

 

शिवाजी महाराजांचा पुतळा जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊनच उभारा असं आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केलं आहे. अमरावतीत सध्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चर्चेचा विषय बनला आहे. याच मुद्दयावरून आमदार रवी राणा यांच्यासह त्यांच्या ११ कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तर दुसरीकडे शिवाजी महाराजांचा पुतळा राजापेठ उड्डाणपूलावरच बसवणार असल्याचं खासदार नवनीत राणा यांनी सांगितलं आहे. यावर आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी परवानगी न घेता पुतळा उभारणाऱ्यांना इशारा देत म्हटलं आहे की, ‘जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतरच पुतळा उभारा. पुतळा उभा केल्यानंतर त्याची सुरक्षितता महत्वाची आहे.’ प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा इशारा दिला आहे.

तसेच ते पुढे म्हणाले की, ‘शिवाजी महाराजांवरील प्रेम मी समजू शकतो. मात्र जे नियम घालण्यात आले आहेत त्यांचं पालन करावं. कोरोनाशी लढताना केंद्र सरकारकडून बंधनं घालण्यात आली आहेत. त्यामुळे केवळ हिंदूंना टार्गेट करण्यात येतं आहे, हे म्हणण चुकीचं आहे. समाजात अस्वस्थता निर्माण करण्याचं काम होत आहे.

Team Global News Marathi: