बंगालमध्ये विजय मिळवल्यानंतर ममता बॅनर्जी गुजरातमध्ये विजयचा पताका रोवणार |

गुजरात | पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचा दणदणीत पराभव करून केंद्रातील मोदी सरकारला ममता बॅनर्जी यांनी मुळापासून हलवले होते. आता त्या पाठोपाठ पश्चिम बंगालमध्ये दाखवलेला करिष्मा पुढच्या अर्शी होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये दाखवण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी कंबर कसली आहे.

गुजराथ मध्ये प्रथमच ममता दिदींचे गुजराथी भाषेतील बॅनर अहमदाबाद येथे झळकले असून त्यासाठी शहीद दिनाचे निमित्त साधले गेले आहे. विशेष म्हणजे गुजराथ मध्ये पुढच्या वर्षात विधानसभा निवडणुका होणार आहेत.यापूर्वी ‘शहीद दिवस’ फक्त बंगाल पुरताच साजरा होत होता.

१९९३ मध्ये कोलकाता येथे युवा कॉंग्रेस रॅलीवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १३ लोकांचा मृत्यू झाला होता. त्या दिवसाची आठवण म्हणून हा शहीद दिन बंगाल मध्ये पाळला जातो. तृणमुल कॉंग्रेसने त्याची सुरवात केली होती. यावेळी मात्र ममता दीदी अनेक राज्यात या दिनाच्या निमित्ताने व्हर्च्युअल बैठक घेणार आहेत. तामिळनाडू, दिल्ली, पंजाब, त्रिपुरा, गुजराथ, उत्तरप्रदेश या राज्यात ममतादिदींचे भाषण प्रसारित केले जाणार आहे. करोना मुळे सलग दुसऱ्या वर्षी दीदी व्हर्च्युअल बैठक घेत आहेत. मात्र गुजरातमध्ये झळकलेल्या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Team Global News Marathi: