कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाढ मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. अशातच विवीध मुद्द्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घरात असताना दुधाच्या मुद्द्यावरुन काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांने थेट मोदी सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. सध्या दूध आणि दहीच्या उद्द्यावरून राजकारण पेटले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार गुजरातच्या अमूलला कर्नाटकातील बाजारपेठेत प्रवेश करायचा आहे.
पण कर्नाटक दूध महासंघाचं नंदिनी दूध येथे आधीच बाजारात उपलब्ध आहे. आता अमूलच्या आगमनानं कर्नाटक दूध उत्पादनावर परिणाम होऊ शकतो असं म्हटलं जात आहे. यावरून कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. सध्या कर्नाटकात विरोधकांकडे अनेक मुद्दे असले तरी यावेळी नंदिनी विरुद्ध अमूल ही लढाई तीव्र झाली आहे. “”तुमचा कर्नाटकात येण्याचा उद्देश कर्नाटकला देणं आहे की लुटणं?,” असं म्हणत सिद्धरामय्या यांनी मोदींवर सडकून टीका केली आहे.
“येथील बँक, बंदर, विमानतळ यापूर्वीच हिसकावून घेतले आहे. आता तुम्ही आमच्याकडून नंदिनीला चोरायचा प्रयत्न करत आहात का? आमची विजया बँक गुजरातच्या बडोदा बँकेत विलीन झाली. कर्नाटकातील बंदरं आणि विमानतळ गुजरातच्या अदानींकडे सोपवण्यात आली. आता गुजरातची अमूल आमची केएमएफ ताब्यात घेण्यास तयार आहे,” असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
येथील बँक, बंदर, विमानतळ यापूर्वीच हिसकावून घेतले आहे. आता तु्म्ही आमच्याकडून नंदिनीला हिसकावण्याचा प्रयत्न करत आहात का? आमची विजया बँक गुजरातच्या बँक ऑफ बडोदामध्ये विलीन झाली. कर्नाटकातील बंदरं आणि विमानतळ गुजरातच्या अदानींकडे सोपवण्यात आली. आता गुजरातची अमूल आमची केएमएफ ताब्यात घेण्यास तयार आहे,”असा आरोपही सिद्धरामय्या यांनी केला.