सध्या ऑनलाइन जगतात खरेदी-विक्रीच्या प्रमाणात जितकी वाढ झाली आहे तितकी फसवणुकीच प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलं आहे अशातच जुने मोबाईल खरेदी विक्री करणाऱ्या कॅशिफाय या कंपनी विरोधात मोबाईल विक्रेते त्रस्त झालेले असताना दुसरीकडे आता ग्राहकांना फसवण्याचे धंदेच कॅशिफाय या ऑनलाइन मोबाईल खरेदी विक्री करणाऱ्या कंपनीने सुरु केले आहे. या होणाऱ्या फसवणुकीविरोधात अनेक तक्रारी आल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेने कॅशिफाय विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
प्रकरण असे की मनसे टेलिकॉम सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे कॅशिफाय विरोधात अनेक तक्रारी आल्या होत्या ही कंपनी ऑनलाईन माध्यमातून मोबाईल खरेदी विक्रीचा व्यवसाय करते जर एखाद्या व्यक्तीला आपला मोबाईल कॅशिफाय या वेब-साईड विक्रीसाठी अपलोड केला तर विकत घेताना सांगण्यात येणाऱ्या किमतीमध्ये तो न घेता त्याच्यापेक्षा कमी किमतीमध्ये तो मोबाईल विकत घेऊन घेतलेल्या किमतीपेक्षा अधिक किमतीमध्ये तोच मोबाईल आपल्या ऑनलाईन साईडवर विकते त्यामुळे मोबाईल विकणाऱ्या ग्राहकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
उदारणार्थ जर एकाद्या व्यक्तीचा मोबाईल कॅशिफाय ऑनलाइन माध्यमातून ४०,००० हजार रुपयाला विकत घेते पण मुळात जेव्हा त्यांच्या कर्मचारी मोबाईल घेण्यासाठी व ग्राहकाला विकलेल्या मोबाईलची रक्कम देण्यासाठी घरी जाते तेव्हा त्यातील नसलेल्या चुका दाखवून तो मोबाईल ४० हजार ऐवजी तीस ते पस्तीस हजार रुपयाला विकत घेते ना इलाजाने ग्राहकाला आपला मोबाईल विकण्याशिवाय काहीच पर्याय नसतो अशा अनेक तक्रारी मुंबईतून मनसे टेलिकॉम सेनेकडे आल्या होत्या.
या विरोधात टेलिकॉम सेनेचे अध्यक्ष श्री. सतीश नारकर यांनी स्वतः जातीने या विषयात लक्ष घातले तसेच मुंबई स्थित सर्व स्टोअर्सना पत्र धाडून कंपनीच्या माध्यमातून लोकांना फसवण्याचा आणि लुटण्याचा धंदा लवकरात लवकर बंद करावा जर लोकांना लुबाडण्याचा धंदा बंद केला नाहीतर मनसे स्टईलने आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराच दिला होता तसेच दुकानाच्या बाहेर असलेल्या इंग्रजी पाट्या लवकरात लवकर मराठी करण्यात याव्यात नाहीतर आंदोलनाला सामोरे जावे असे सुद्धा सांगण्यात आले आहे. या संदर्भात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कॅशिफाय दुकानांना भेटी देऊन तक्रारी संदर्भात पत्र दिले आहे.