ड्रग्स केस प्रकरणी राणा डग्गुबतीसह टॉलीवूडमधील १२ जणांना समन्स

 

मुंबई | टॉलीवुड चित्रपट क्षेत्रातील १२ सुप्रसिद्ध सेलिब्रिटींना तस्करी आणि अंमली पदार्थ सेवन केल्याबद्दल समन्स पाठवले आहेत. हे ड्रग्स प्रकरण ४ वर्ष जुने आहे. अंमली पदार्थांची तस्करी आणि सेवन केल्याचा गुन्हा तेलंगणा उत्पादन शुल्क आणि निषेध विभागाने नोंदवला होता. ज्या १२ सेलिब्रिटींना बोलावण्यात आलं आहे त्यामध्ये रकुल प्रीत सिंह, राणा दग्गुबती, रवी तेजा आणि दिग्दर्शक पुरी जगन्नाथ सारखे सुप्रसिद्ध चेहरे आहेत.

रकुल प्रीत सिंगला या प्रकरणी ६ सप्टेंबरला हजर राहण्यास सांगितलं आहे. त्याचवेळी, राणाला ८ सप्टेंबरला, रवी तेजाला ९ सप्टेंबरला आणि पुरीला ३१ ऑगस्टला चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. बोलाविलेल्या या कलाकारांव्यतिरिक्त रवी तेजाचा ड्रायव्हर श्रीनिवास याचेही नाव समाविष्ट आहे. कलाकारांमध्ये चार्मी कौर, नवदीप, मुमैथ खान, नंदू, तरुण आणि टार्निश या नावांचा समावेश आहे.

सामोरं आलेल्या माहितीनुसार अंमलबजावणी संचालनालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, तेलंगणा उत्पादन शुल्क आणि निषेध विभागाने सुमारे १२ गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात ११ आरोपपत्र दाखल करण्यात आले आहेत. विभागाने ३० लाख रुपयांची ड्रग्ज जप्त केल्यानंतर या तक्रारी आणि आरोपपत्र दाखल करण्यात आलं. त्याचंच काही दिवसांपूर्वी बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि अभिनेत्यांची सुद्धा चौकशी करण्यात आली होती .

Team Global News Marathi: