अमृता फडणवीस यांच्या ‘त्या’ गाण्याला हजारांच्या घरात डिस्लाइक

अमृता फडणवीस यांच्या ‘त्या’ गाण्याला हजारांच्या घरात डिस्लाइक

माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी भाऊबीजेच्या दिवशी एक गाणं पोस्ट केले होते. या गाण्यावर दिगदर्शक आणि निर्माते महेश टिळेकर यांनी जोरदार टीका केली होती. ‘गायी म्हशीच्या हंबरण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील पण हा आवाज सहन होत नाही’, असं म्हणत त्यांनी अमृता फडणवीस यांना खरंच गाता येतं का? असा सवाल उपस्थित केला होता.


मात्र या गाण्याला लाईकपेक्षा डिस्लाइक जास्त आहेत. अमृता फडणवीस यांचे हे नवीन गाणे लोकांना फारसं आवडले नाही. यूट्यूबवर रिलीज झालेल्या गाण्याला लाइक्सपेक्षा जास्त लोकांनी डिसलाइक्सच दिले आहेत. नेटकरी लोकांनी तब्बल ५५ हजार डिसलाइक्स दिले आहेत. याशिवाय अनेक नकारात्मक प्रतिक्रियाही दिल्या आहेत. दरम्यान, १५ लाख लोकांनी हे गाणे पहिले देखील आहे.

दरम्यान, मंत्री यशोमती ठाकूर यांनी गाण्याचा आशय चांगला असल्याचे म्हणत त्यांच्या गाण्याचे तोंडभरून कौतुक केले आहे.“सध्या विविध कारणांमुळे अमृता फडणवीस यांचे हे गाणं व्हायरल होत आहे. गाण्याचा आशय छान आहे. मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी जनजागृती महत्त्वाची आहे. माझ्या शुभेच्छा,” असं म्हणत यशोमती ठाकूर यांनी त्यांच्या गाण्याचं कौतुक केलं आहे. त्यांनी ट्विटरवर त्यांचं गाणं शेअर करत कौतुक केलं आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: