मुंबईत येणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वेसेवा बंद करा – महापौर किशोरीताई पेडणेकर

मुंबईत येणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वेसेवा बंद करा – महापौर किशोरीताई पेडणेकर

ग्लोबल न्यूज: सध्या राज्यात तसेच मुंबई शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईत कोरोना आटोक्यात आला होता. मात्र दिवाळीच्या सणानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या १५ दिवसांसाठी रद्द कराव्यात अशी मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.

तसेच लोक कोरोनाबाबत गांभीर्य बाळगत नसल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. दिल्ली, मुंबई रेल्वे सेवा आणि विमान सेवा, तसेच राज्यातून बाहेर जाणारी रेल्वे सेवाही काही काळापुरती पुन्हा बंद करावी, का असा विचार ठाकरे सरकार करत असल्याची प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

१५ दिवसांसाठी लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द कराव्या, राज्य सरकारने लवकर निर्णय घ्यावा. कोरोनाचा आकडा वाढत चालला आहे. लोक करोनाबाबत गंभीर नाहीत. मुंबईचं राजकारण करण्याचा घाट दोन टक्यांच्या लोकांनी घातला आहे, असा आरोप महापौर पेडणेकर यांनी भारतीय जनता पक्षाचे नाव न घेता केला आहे. केवळ घर्मस्थळं मी म्हटले नाही, बारसुद्धा, बारमध्ये जाणाऱ्यांमुळेही कोरोना पसरला. कोविडचा आकडा वाढल्याने मुंबईकरांनी सावध राहावे, असे आवाहन महापौरांनी केले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: