दिपांकर दत्तांकडून मुख्यमंत्री सहायत्ता निधीला ३ कोटींची मदत

 

मुंबई | कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक दानशूर व्यक्तींनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडून मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आली होती आता त्या पाठोपाठ मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ३ कोटी ४१ लाख ९८ हजार ५९७ चा धनादेश आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केला.

स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई उच्च न्यायालयात आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमानंतर हा धनादेश मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. राज्य सरकार करीत असलेल्या कोरोना संसर्गाच्या लढाईत न्यायालयाच्या सामजिक जबाबदारीचा हा भाग आहे असे त्यांनी म्हटले आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे सर्व न्यायिक अधिकारी, जिल्हा न्यायाधीश तसेच सर्व कर्मचारी यांचे यात योगदान आहे.

राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियमांमध्ये शिथीलता दिली असली तरी राज्यातील कोरोनाचे संकट वाढल्यास पुन्हा लॉकडाऊन लावण्याचा इशाराही दिला आहे. ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त त्यांनी जनतेला कोरोनाचे संक्रमण वाढू नये यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

उद्यापासून राज्यात अनेक निर्बंध शिथिल केले जात आहेत. मात्र कोरोनाचं संकट अद्यापही कायम आहे. आता निर्बंध शिथिल करत असलो तरी कोरोनाचे संक्रमण पुन्हा वाढू नये, यासाठी आपल्यालाच खबरदारी घ्यायची आहे, पुन्हा लॉकडाऊन लावण्याची वेळ येऊ देऊ नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे

Team Global News Marathi: