“उद्धव ठाकरे सुसंस्कृत नेते, पण धुक्यात त्यांनी भलताच हात धरला”

पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २५ वर्ष भारतीय जनता पक्षाची साथ सोडून मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर हातमाळवली करून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले होते. याच मुद्द्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर अनेकवेळा टीका सुद्धा केली होती. आता याच मुद्द्याला धरून भाजपा नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री ठाकरे यांना टोला लगावला आहे.

वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी फेस टू फेस या कार्यक्रमात भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांची मुलाखत घेतली. या अराजकीय मुलाखतीत सुधीर मुनगंटीवार यांची राजकारणाव्यतिरिक्त एक वेगळीच बाजू सर्वांना पाहायला मिळाली. यादरम्यान, मुलाखतीत मुनगंटीवारांना काही नेत्यांना एक गाणं डेडीकेट करायचं आणि त्यांचा एक चांगला गुण सांगून त्यांना सल्ला द्यायला सांगितला. त्यावर मुनगंटीवार यांनी भन्नाट उत्तरे दिली.

अतुल कुलकरी यांनीमुनगंटीवारांना मुख्यमंत्र ठाकर बद्दल विचारले असताना मुगतीवर म्हणाले की, उद्धव ठाकरे एक सुसंस्कृत आणि पारिवारीक राजकारणी आहेत. पण, त्यांनी अचानक आमची साथ सोडली आणि धुक्यात भलत्याच व्यक्तीचा हात पकडला. आता त्यांना तो हात सोडताही येत नाही, असे म्हटले. तसेच, ‘भला किसी का कर ना सके तो, बुरा किसी का मत करना…पुष्प नही बन सकते तुम काटे मत बनना…’हे गाण डेडीकेट केलं होत.

Team Global News Marathi: