धनश्री काडगावकर पुन्हा साकारणार दमदार खलनायिकाची भूमिका

 

तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील वाहिनीसाहेब अर्थात अभिनेत्री धनश्री काडगावकर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच ती एका नव्या कोऱ्या भूमिकेत प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. झी मराठी वाहिनीवर येत्या १५ ऑगस्टपासून ‘तू चाल पुढं’ हि मालिका सुरु होत आहे. सध्या या मालिकेचा प्रोमो सोशल मिडीयावर वायरल झाला आहे.

याच मालिकेत धनश्री काडगावकर महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.’डोक्यात काय फॉल्टय काय?’ असं ठसक्यात म्हणणाऱ्या वहिनीसाहेब आता नवीन भूमिकेत दमदार खलनायिका साकारण्यास सज्ज झाल्या आहेत. धनश्रीने तिच्या सोशल मीडियावरून मालिकेचा प्रोमो शेअर करत चाहत्यांना हि आनंदाची बातमी दिली आहे.

हि पोस्ट शेअर करताना धनश्रीने लिहिलंय कि,’एका मोठ्या ब्रेकनंतर एक नवं character घेऊन येत आहे, तुमचं प्रेम असंच राहू द्या’, अशा शब्दांमध्ये तिने भावना व्यक्त केल्या आहेत. या मालिकेत धनश्रीची भूमिका काय असेल हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण झी मराठीने या नवीन मालिकेच्या प्रदर्शित केलेल्या प्रोमोमध्ये धनश्रीच्या भूमिकेला खलनायिकेची छटा आहे असं दिसतंय.

Team Global News Marathi: