सोलापूर: खळबळजनक एका राजकीय नेत्याचा बेडरूमधील व्हिडीओ महिलेने केला व्हायरल !

सोलापूर: खळबळजनक एका राजकीय नेत्याचा बेडरूमधील व्हिडीओ महिलेने केला व्हायरल !

सोलापूर : सोलापूर भारतीय जनता पार्टीसाठी मोठी अडचण आणणारी घटना समोर आली आहे. जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख हे आता चांगलेच अडचणीत आले आहेत. देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी एका महिलेविरोधात मुंबईमध्ये हनीट्रॅपची केस दाखल केली होती.

त्यानंतर मंगळवारी त्याच महिलेने आपला बेडरूम मधील व्हिडिओ स्वतःहून व्हायरल केला आहे. त्यामध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख हे दिसतात आणि दोघांचे भांडण होते.त्या महिलेला अंगावर धावून येत मोबाईलवरील व्हिडिओ बंद करण्यासाठी ढकला-ढकली करतो.

याचवेळी ती महिला म्हणते, ‘नाही.आता तू बघंच..तुला नाही सोडणार.तू माझ्याशी का खोटं बोलला. का खोटं बोलता ?’ मात्र ती चवताळून बोलत असतानाच कॅमेरा बंद होतो. हा व्हायरल व्हिडिओ सोशल मिडियावर मंगळवारी सकाळपासून व्हायरल होतोय.

या व्हिडिओमुळे श्रीकांत देशमुख यांची अडचण वाढणार असून आता भारतीय जनता पार्टी याबाबत काय निर्णय घेणार या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: