देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यामुळे भष्टाचार करणाऱ्यांना संरक्षण मिळतंय

राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून विरोधकांनी विविध मुद्द्यावरून जोरदार निशाणा त्यांच्यावर साधला आहे अशातच आता भीमा पाटस कारखान्याच्या गैरव्यवहारावरून खासदार संजय राऊत यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे. मी गृहमंत्री झाल्यामुळं भ्रष्टाचार करणाऱ्यांना अडचण होत असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. म्हणून मी भीमा पाटस कारखान्याच्या गैरव्यवहाराचे प्रकरण पुन्हा त्यांच्याकडे पाठवले होते. पण त्यावर कारवाई झाली नसल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.

तसेच देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्यांना संरक्षण मिळालं असल्याचा आरोपही संजय राऊतांनी यावेळी केला आहे.देवेंद्र फडणवीसांच्या अवतीभोवती असणाऱ्या भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना संरक्षण मिळत आहे. ५०० कोटींचे गैरव्यवहाराचे प्रकरण मी पुराव्यानिशी दिले आहेत. मात्र त्यानंतरही कारवाई केली जात नसल्याची माहिती संजय राऊतांनी आज पत्रकार परिषदेत दिली. शेतकऱ्यांचे पैसे लुटणाऱ्यांना पाठिशी घालू नये, असं आवाहान देखील संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना केलं आहे.

बारसू येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाविरोधात रत्नागिरीमध्ये पुन्हा एकदा आंदोलन पेटले आहे. रिफायनरी प्रकल्पासाठी येथील जमिनीचे सर्वेक्षण करण्यात येत असून, त्याविरोधात हजारो ग्रामस्थ बारसूमधील सड्यावर जमले आहेत. तसेच त्यांच्याकडून पोलीस आणि अधिकाऱ्यांची वाट अडवण्यात येत आहे. यावर देखील संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. बारसूमधील रहिवाशांना धमक्या दिल्या जात आहेत. तसेच हे आंदोलक तिथून हटले नाहीत तर त्यांच्यावर गोळ्यासुद्धा झाडल्या जातील आणि जालियनवाला हत्याकांडाप्रमाणे बारसूमध्येही हत्याकांड घडवलं जाईल, अशी मला भीती वाटतेय, असा दावा राऊत यांनी केला आहे.

Team Global News Marathi: