महाराष्ट्रात नद्यांचे जाळे; मग ८ दिवसांनी पाणी का ? या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा सवाल

 

महाराष्ट्रात सर्वाधिक नद्यांचे जाळे असताना, स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांत नागरिकांना आठ दिवसांआड पाणी दिले जाते, असे का? असा प्रश्न उपस्थित करून भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष व तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव थेट महाराष्ट्रातील राजकर्त्यांनी आरसा दाखवला आहे तसेच भारत राष्ट्र समितीचा गुलाबी झेंडा राज्यात सत्तेवर आणा तेलंगणाप्रमाणे नळाला दररोज पाणी आणि मोफत वीज आम्ही देतो, असे आश्वासन के.चंद्रशेखर राव यांनी सोमवारी येथील जाहीर सभेत बोलताना दिले.

बीआरएसतर्फे शहरातील जबिंदा मैदानावर आयोजित पहिल्याच जाहीर सभेत त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. महाराष्ट्राच्या पवित्र भूमीस प्रणाम करून, केसीआर यांनी आपल्या भाषणास प्रारंभ केला.महाराष्ट्रापेक्षा खूप लहान व गरीब तेलंगणा राज्य शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज व शेतीला पाणी देते. एकरी दहा हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करतो, दलितांच्या विकासासाठी दलित बंधू योजना राबवितो, तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महाराष्ट्र राज्याला का शक्य होत नाही, असा प्रश्न उपस्थित केला.

पुढे ते म्हणाले, इथल्या राज्यकर्त्यांची हे देण्याची नियत नाही. महाराष्ट्रात धनाची नव्हे, कर मनाची कमी आहे. त्यामुळे आता वाघ व्हा. परिवर्तनाशिवाय काहीही मिळणार नाही. आगामी निवडणुकात जिल्हा परिषदेवर बीआरएसचा गुलाबी झेंडा फडकवा, महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे सरकार आणा, आम्ही एका झटक्यात येथील शेतकरी आत्महत्या थांबवू. तेलंगणात दिल्या, त्या योजना येथे सुरू करू. मंचावर लोह्याचे माजी आमदार शंकरअण्णा धोंगडे यांच्यासह तेलंगणातून आलेले खासदार पाटील, अनेक आमदारांसह शहरातील माजी आमदार अण्णासाहेब माने पाटील, हर्षवर्धन जाधव, संतोष पाटील, फिरोज पटेल, कदीर मौलाना आदींची उपस्थिती होती.

 

Team Global News Marathi: