प्रिय दिल्लीश्वरांनी आपल्या दिलदारीचं प्रदर्शन करावं, पुन्हा सामनातून मोदी सरकारला लगावला टोला !

 

मुंबई | कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पडणाऱ्या धो-धो पावसामुळे अनके ठिकाणी दरडी कोसळून निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. तसेच पुराच्या पाण्यामुळे अनेकांच्या घराचे अतोनात नुकसान झाले होते. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लवकरात लवकर मदत जाहीर करावी अशी मागणी आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेना नेते आणि क्षार संजय राऊत यांनी केली आहे.

संबंधित मंत्री, पालकमंत्री, अधिकारी यांना सूचना देताना दिसत होते. तरीही ‘मुख्यमंत्री लगेच का पोहोचले नाहीत?’ असा पोरकट प्रश्न विचारणारे काही लोक स्वतःचेच हसे करून घेत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता आपत्तीग्रस्त भागात पोहोचलेच आहेत, पण आधी मदत पोहोचणे गरजेचे होते. दुर्घटनास्थळी पोहोचून फोटोचे कार्यक्रम उरकणं याला संवेदना किंवा पुनर्वसन म्हणता येत नाही, असं म्हणत शिवसेेनेनं अग्रलेखातून विरोधकांवर निशाणा साधला आहे.

कोल्हापूर, सांगलीत पूरपरिस्थितीने चिंता निर्माण केली आहे. अर्ध कोकण दरडग्रस्त आणि जमीनदोस्त झाल्याचं चित्र विदारक आहे. महाराष्ट्रातील १५ जिल्हय़ांना महाप्रलयाचा जबरदस्त फटका बसला आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक, जळगाव, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नगर, अमरावती, भंडारा, रत्नागिरी, रायगड आणि मुंबईतील काही भागांवर पावसाने कोप केला आहे. या सर्व संकटांतून बाहेर पडण्यासाठी राज्याला हजारो हातांचे बळ लागेल, असं अग्रलेखात म्हटलंय.

Team Global News Marathi: