मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाही विरोधकांच्या टीकेला आदित्य ठाकरे यांच उत्तर !

 

मुंबई | राज्यातील अनेक जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. याचा अधिकांश फटका कोकणातील महाड आणि चिपळूणला बसला. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्त हानीही झाली.

यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दौरा केला. याच बरोबर आज केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे, राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही आज कोकणातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यासंदर्भात बोलताना, मातोश्रीचा दरवाजा बंद होता. हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट असतात तसे ते (मुख्यमंत्री उद्धव ठाकरे) अ‍ॅडमिट होते. आज सकाळी डिस्चार्ज केला. ते डायरेक्ट चिपळूणमध्ये आले. काय मुख्यमंत्री? कसली संवेदना? थोडी तरी आहे का? हे झाल्या झाल्या पाहायला यायला पाहिजे होतं, अशी टीका राणेंनी केली होती.

यावर बोलताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आता थेट उत्तर दिले आहे. जर आपण विरोधकांवर लक्ष केंद्रीत करत राहिलो, तर काहीच करू शकणार नाही. आपल्याला राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करावे लागेल. यावेळी लोकांच्या पाठीशी उभे राहण्याची आवश्यकता आहे, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

Team Global News Marathi: