दातांची शस्त्रक्रिया चुकली, अभिनेत्रीच्या चेहऱ्याची पूर्णच वाट लागली

 

कोणत्याही अभिनेत्यासाठी त्याचा चेहरा हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा घटक असतो. अभिनेता असो किंवा अभिनेत्री असो, चेहऱ्यावर त्यांची संपूर्ण कारकिर्द अवलंबून असते. त्यामुळे अभिनेते विशेषतः अभिनेत्री आपल्या चेहऱ्याची विशेष काळजी घेतात. अनेक शस्त्रक्रिया करून तो सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण, जर ती शस्त्रक्रिया चुकली तर महागात पडू शकतं.

एका अभिनेत्रीला अशीच एक चूक महागात पडली आहे. या अभिनेत्रीचं नाव स्वाती सतीश असं आहे. ती कन्नड अभिनेत्री असून तिने काही दिवसांपूर्वी दातांवर शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया म्हणजे रूट कनाल. किडलेला दात वाचवण्यासाठी ही शस्त्रक्रिया केली जाते. पण, ही शस्त्रक्रिया चुकल्याने अभिनेत्रीचा चेहरा विद्रुप झाला आहे.

स्वातीने काही दिवसांपूर्वी बेंगळुरू येथे रूट कनाल शस्त्रक्रिया करवली. त्यानंतर तिच्या चेहऱ्याला सूज आली आणि तिला दुखू लागलं. हे दुखणं थांबेल असं आश्वासन तिच्या डॉक्टरांनी दिलं मात्र दोन ते तीन आठवड्यांनीही तिची सूज कमी झाली नाही. त्यामुळे तिच्या चेहरा ओळखण्यापलिकडे वेगळा दिसू लागला. अखेर तिने दुसऱ्या डॉक्टरांकडे धाव घेतली. त्यानंतर या चुकीचा शोध लागला. रूट कनाल करण्यापूर्वी भूल देण्याच्या द्रावणाऐवजी तिला सेलिसिलीका अॅसिड देण्यात आलं. त्यामुळे तिच्या चेहऱ्याची अशी अवस्था झाल्याचं तिला समजलं.

Team Global News Marathi: