नॉट रिचेबल झाल्यानंतर मंत्री एकनाथ शिंदेंची पहिली फेसबुक पोस्ट

 

शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर अनेक आमदार नॉट रिचेबल आहेत. नॉट रिचेबल असणारे आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत सूरत येथील हॉटेलवर असल्याचे बोलले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या या निर्याणानंतर महाविकास आघाडी टिकणार की कोसळणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात बोलली जात आहे.

एकनाथ शिंदे सूरतमध्ये असल्याची सूत्रांची माहिती आहे. सूरतच्या द ग्रँड भगवती हॉटेलमध्ये काही आमदारांची बैठक झाली. धक्कादायक बाब म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासह द ग्रँड भगवतीमध्ये शिवसेनेचे 17 आमदार असल्याची माहिती आहे. हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेत्यांची बैठक झाल्याची माहिती सूत्रांची आहे. तर दुसरीकडे नॉट रिचेबल झाल्यानंतर शिंदे यांनी पहिली फेसबुक पोस्ट केली आहे.

एकनाथ शिंदे सध्या नॉट रिचेबल आहेत. त्यानंतर त्यांनी पहिली फेसबुक पोस्ट लिहिली आहे. “योग म्हणजेच संतुलित मन, सुखी, निरोगी आणि समृध्द जीवनाचा राजमार्ग…”, अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे. काल रात्रीपासून एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये आहे. सूरतच्या ली मेरिडिअन हॉटेलात ते थांबले आहेत. काल रात्री उशीरा ते हॉटेलमध्ये गेले असण्याची शक्यता आहे. सकाळपासून ते नॉट रिचेबल असल्याचं म्हटलं जातं आहे. सगळीकडे राजकीय चर्चांना उधान आलेलं असतानाही ते रिचेबल झालेले नाहीत.

शिवसेनेचे काही आमदार त्यांच्यासोबत असल्याची माहिती मिळाली आहे. कालच्या शिवसेनेच्या बैठकीला अनेक आमदार गैरहजर असल्याची माहिती समजली होती. तेचं आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहाजी बापू पाटील, महेश शिंदे सातारा, भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेश थोरवे, विश्वनाथ भोईर, संजय राठोड, संदीपान भुमरे, उदयसिंह राजपूत, संजय शिरसाठ, रमेश बोरणारे, प्रदीप जैस्वाल, अब्दुल सत्तार इत्यादी आमदार सोबत असल्याची माहिती मिळाली आहे.

Team Global News Marathi: