कोरोनाबाधित पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांसाठी गोरेगावात सर्व सोयीयुक्त आयसोलेशन सेंटर

राज्यात सध्या मोठया प्रमाणात कोरोनाची लागण होत असल्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यात अत्यावश्यक सेवेत मोडणारे पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा लीरॉनची लागण होत असल्याचे चित्र दिसून आले आहे, या पार्श्वभूमीवर कोरोनाची लागण झालेल्या मात्र होम क्वारंटाइन केलेल्या पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी गोरेगाव येथे एका थ्री स्टार हॉटेलमध्ये आयसोलेशनची व्यवस्था करण्यात आली आहे.

सर्व बाबींनी सुसज्ज अशा या 78 रूमच्या सात मजली ‘द फेर्न अॅनेकॉटेल’ या हॉटेलमध्ये जवळपास दीडशे बाधितांना ठेवण्याची व्यवस्था असणार आहे. या सुविधेमुळे होम क्वारंटाइन राहून कोरोनाचा संसर्ग होण्यापासून रोखण्याबरोबर पॉझिटिव्ह रुग्णाला लवकरात लवकर बरे करण्यास मदत होणार आहे. पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत आहे. जे पोलीस अधिकारी, अंमलदार व त्यांचे कुटुंबीय कोरोनाबाधित आहेत व त्यांना विलगीकरणाचा सल्ला देण्यात आलेला आहे असे रुग्ण घरी राहिल्यास त्यांच्यापासून कुटुंबातील इतर सदस्यांना संसर्ग होऊ शकतो.

कोरोनाक संसर्गाचा हा धोका टाळण्यासाठी उत्तर प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांच्या पुढाकाराने व सेल कंपनी आणि जितो फाऊंडेशनने मुंबई पोलीस दलातील पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी गोरेगाव येथील ‘द फेर्न अॅनेकॉटेल’ या तीन तारांकित सात मजली हॉटेलमध्ये आयसोलेशनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दिलीप सांवत यांच्या हस्ते या आयसोलेशन सेंटरचे गुरुवारी उद्घाटन करण्यात आले. या हॉटेलमधील आयसोलेशन सेंटरमध्ये दाखल होणाऱया पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी नाश्ता, जेवणाची तसेच वैद्यकीय उपचाराची सुविधा उपलब्ध असणार आहे.

Team Global News Marathi: