‘सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट’ वरून राष्ट्रवादीची पंतप्रधान मोदींवर टीका !

सध्या संपूर्ण देशभरात कोरोना रुग्णसंख्या झपाटयाने वाढताना दिसत आहे, त्यात रुग्णसंख्या सुद्धा वाढताना दिसत आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्यामुळे आरोग्य सुविधा, ऑक्सिजन साथ सुद्धा पौर पडू लागला आहे. आज ऑक्सिजन अभावी अनेक राज्यांमध्ये लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहे. याच मुद्द्यावरून आता राष्ट्र्वादीने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

देशात कोरोनारुग्णांची संख्या दररोज नवा उच्चांक गाठत आहे. महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार उडाला असून, मृतांचा आकडा देखील झपाट्याने वाढत आहे. लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली असली तरी लसी अभावी अनेक लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागल्याचे समोर आले आहे. मात्र दुसरीकडे दिल्लीत नव्या संसद भवनाचे काम जोरात सुरू आहे. हाच मुद्दा पकडून राष्ट्र्वादीने ट्विट केले आहे की, ‘सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट’ पुढे कोरोनाचे भीषण संकटही ठरतेय क्षुल्लक ! देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असताना, आरोग्य सुविधा, ऑक्सिजन, औषधांअभावी लोकांचे बळी जात असताना, कोरोनाविरुद्ध निकराची लढाई सुरु असताना पंतप्रधानांचे प्राधान्य कशाला आहे? असा प्रश्न विचारण्यात आला आहे.

आज अनेक राज्यांमध्ये कोरोना संक्रमणामुळे लॉकडाऊनची परिस्थिती असताना व कामे ठप्प असताना सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टचे काम जोमाने सुरू आहे. नवीन संसद भवन व पंतप्रधानांच्या नवीन घराच्या बांधकामाचा समावेश अत्यावश्यक सेवा अधिनियमात करण्यात आला आहे. त्यापुढे कोरोनाचे संकटही क्षुल्लक ठरत आहे, अशा शब्दात पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधानांच्या नव्या घरासाठी डिसेंबर २०२२ तर नवीन संसद भवनासाठी नोव्हेंबर २०२२ ही डेडलाईन ठरवण्यात आली आहे. देशातील नागरिकांच्या लसीकरणासाठी अशी कोणतीही डेडलाईन ठरवलेली नाही का?, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

 

Team Global News Marathi: