कोरोनाला आमत्रंण देणाऱ्यांनाच ऑक्सिजनची गरज, संजय राऊतांनी लगावला मनसेला चिमटा

 

मुंबई | भाजपासह मनसेनेही दहीहंडी उत्सवाला सुरवात करून राज्य सरकारच्या नियमांना केराची टोपली दाखवली होती. तसेच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषेद घेऊन हिंदू सणांवर बंदी घालणाऱ्या राज्य सरकार विरोधात तोफ डागली होती. आता या टीकांवर खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत दहीहंडीला साजरा करणाऱ्या पक्षांना टोला लगावला आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट कायम असतांना काही आदर्श काम करण्याऐवजी केवळ विरोधाला विरोध म्हणून दहीहांडी साजरी करुन कोरोनाला आमत्रंण देण्याचे जे काही केले जात आहे, त्यांनाच उद्या या ऑक्सीजनची गरज लागणार असल्याची खरमरीत टिका शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी मनसेवर केली आहे.

ठाण्यात संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या वतीने उभारण्यात आलेल्या ऑक्सीजन प्लानटचे लोकार्पण ऑनलाईन पध्दतीने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी ही टिका केली. आज कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी तिस:या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे कोरोना बाबत काही र्निबध कायम ठेवण्यात येत आहेत. परंतु असे असतांना मनसेने हे निर्बंध झुगारुन दहीहांडी उत्सव साजरा केला आहे. त्यावरुन राऊत यांनी त्यांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.

ते म्हणाले की, दहीहांडी उत्सव साजरा करुन केवळ कोरोनाला आमत्रंण देण्याचे कामच या मंडळींकडून सुरु आहे. त्यामुळे अशांनाच आता या ऑक्सीजनची गरज लागणार असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. महाराष्ट्र, केरळ, मेघालय या तीन राज्यांना कोरोनाच्या तिस:या लाटेचा धोका संभावण्याची अधिक शक्यता आहे. परंतु तरी देखील महाराष्ट्रातील काही राजकीय पक्ष आणि संघटना, मंदिरे उघडण्यासाठी घंटानाद करतात.दहीहांडीसाठी आंदोलन करीत आहेत, परंतु आमचे ऐकू नका, केवळ विरोधाला विरोध केला जात आहे.

Team Global News Marathi: