“कोरोना बाबत गाफील राहू नका, अन्यथा पुन्हा कडक निर्बंध लावावे लागतील”

 

ठाणे | ठाण्यात संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या वतीने उभारण्यात आलेल्या ऑक्सीजन प्लानटचे लोकार्पण ऑनलाईन पध्दतीने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलतांना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कोरोनाच्या संभाव्य तिस:या लाटेचा धोका टास्फ फोर्सने देखील वर्तविला आहे. त्यात मागील काही दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे. त्यामुळे निश्चितच ही चिंतेचा बाब आहे. परंतु नागरीकांनी राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे अन्यथा पुन्हा नाईलाजास्तव कडक र्निबध घालावे लागतील असा इशारा त्यांनी दिला आहे.

ठाण्यात संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या वतीने उभारण्यात आलेल्या ऑक्सीजन प्लानटचे लोकार्पण ऑनलाईन पध्दतीने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलतांना शिंदे यांनी हा इशारा दिला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुस:या लाटेने अधिक चिंता वाढविली होती. त्यावेळेस ऑक्सीजन आणि रेमडिसवरचा तुटवडा जाणवला होता.

मात्र राज्य सरकाराने केलेल्या कामामुळे आणि नागरीकांनी घेतलेल्या काळजीमुळे ही लाट थोपविता आलेली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याच कालावधीत विविध महापालिका हद्दीत एक ते दोन ऑक्सीजनचे प्लान्ट देखील उभारण्यात आले आहेत. त्यासाठी राज्य शासन आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून देखील निधी देण्यात आला आहे. परंतु आता तिस:या लाटेचा धोका वर्तविण्यात आलेला आहे.

Team Global News Marathi: