कोरोना संदर्भात मुंबईकरांना दिलासा, आदित्य ठाकरे यांनी दिली माहिती

 

मुंबई | करोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत मुंबईत हाहाकार माजविणाऱ्या कोरोना संसर्गापासून मुंबईकरांना आता दिलासा मिळाला आहे. मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असून आजच्या स्थितीला शहरात एकही कंटेन्मेंट झोन उरलेला नाही. त्याचप्रमाणे शनिवारी महाराष्ट्रासह मुंबईत विक्रमी लसीकरण झाले आहे.

करोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत मुंबईला मोठा तडाखा बसला होता. दुसऱ्या लाटेत एकट्या मुंबईची करोना रुग्णांची संख्येत वाढ होऊन आकडा १० हजारांपर्यंत पोहोचला होता. मात्र, कठोर निर्बंध आणि पालिकेचं नियोजनामुळं आता मुंबईतील करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत आहे.

मंत्री आदित्य ठाकरे यांनी एक ट्वीट करत आनंदाची बातमी दिली आहे. शनिवारी रात्री ९ वाजेपर्यंत महाराष्ट्रात ९. ५२ लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. तर, १. ५१ लाख मुंबईकरांचे लसीकरण झाले. व आजघडीला मुंबईत एकही कंटेनमेंट झोन नाही, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Team Global News Marathi: