सततचा पाऊस- बार्शी टालुक्यातील आठ मंडळासाठी 63 कोटी मंजूर

बार्शीसह जिल्ह्यातील सततच्या पावसाने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 107 कोटींचा निधी मंजूर;
सततचा पाऊस- बार्शी टालुक्यातील आठ मंडळासाठी 63 कोटी मंजूर

राज्य सरकारने शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली-आमदार राजेंद्र राऊत

बार्शी: सततच्या पावसाने बाधित पण अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या राज्यातील विविध जिल्ह्यातील 8 लाख 28 हजार 384 शेतकऱ्यांना 755 कोटींची मदत राज्य सरकारच्या वतीने मंजूर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 1 लाख 13 हजार 864 बाधित शेतकऱ्यांना 107 कोटी 2 लाख 10 हजार निधी मिळणार आहे. त्यात सर्वाधिक 63 कोटी रुपये निधी हा बार्शी तालुक्यातील आठ मंडळासाठी असणार आहे. हा निधी दिवाळीपूर्वी मंजूर करून शिंदे-फडणवीस सरकारने खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली असल्याची प्रतिक्रिया आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.

ही मदत निकषात बसत नव्हती. मात्र विशेष बाब म्हणून मागील दहा दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ उपसमितीने मंजुरी दिली. यामुळे राज्यातील आणखी 5,49,646 हेक्टर क्षेत्राला लाभ मिळणार आहे. बार्शी

चौकट

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, दक्षिण सोलापूर, अप्पर मंद्रुप आणि अक्कलकोट तालुक्यातील 1 लाख 13 हजार 864 शेतकऱ्यांच्या 74 हजार 446 हेक्टर वरील बाधित पिकांसाठी 107 कोटी 21 लाख 780 रुपये मिळणार आहेत. तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी 23 सप्टेंबर रोजी कृषी आयुक्तालयाकडे पाठवला होता.

 

तालुकानिहाय गेलेल्या प्रस्तावानुसार मिळणारी मदत

बार्शी- बाधित शेतकरी-66029 ,बाधित क्षेत्र-44122 मंजूर रक्कम-63 कोटी 72 लाख 3200,

दक्षिण सोलापूर-10573-7960-12 कोटी 2 लाख 3680,
अप्पर मंद्रुप-879-1042-1 कोटी 57 लाख 59500
अक्कलकोट- 33383-21321-29 कोटी 70 लाख 24400

आमदारांचा पाठपुरावा

बार्शीसह जिल्ह्यातील या वगळलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मदत व पुनर्वसन विभागाचे मुख्य सचिव गुप्ता यांच्याकडे सतत पाठपुरावा करत होतो. विशेष बाब म्हणून हा राज्य सरकारने हा निधी देऊन शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने दिवाळी गोड केली आहे. यामुळे बाजारात पैसा उपलब्ध होऊन दिवाळीत बाजाराची उलाढाल वाढण्यास ही मदत होणार आहे. आता देखील पाऊस सुरूच आहे. या मदतीप्रमाणे शेतकऱ्यांना पीक विमा देखील मिळावा यासाठी मी पाठपुरावा सुरूच ठेवणार आहे.
राजेंद्र राऊत आमदार बार्शी

चौकट :आठ मंडळाला मिळणार पैसे

बार्शी तालुक्यातील खांडवी आणि बार्शी मंडळा साठी अतिवृष्टी ची मदत जाहीर करून सदरचे पैसे शेतकऱ्यांना पैसे देखील वितरित करण्यात आले आहेत. आता उर्वरित वैराग, पानगाव, आगळगाव,सुर्डी, उपळे दु, गौडगाव, नारी, पांगरी या आठ मंडळासाठी खास बाब म्हणून 63 कोटी रुपये मिळणार आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: