ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके आज अर्ज भरणार, शिवसैनिक करणार प्रदर्शन

 

राजकीय घडामोडीनंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) या पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरून गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने महापलिका प्रशासनाला धारेवर धरले. न्यायालयाने महानगरपालिकेला राजीनामा मंजूर करण्याचा आदेश दिल्याने लटके यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला.

आज, शुक्रवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ऋतुजालटके ठाकरे गटाकडून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार आहेत. इतकेच नाही तर ठाकरे गटचजे शिवसैनिक जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असल्याची माहिती समोर आहे.

भाजप-बाळासाहेबांची शिवसेना युतीचा उमेदवारही आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत, असे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितले.न्यायालयाच्या या निर्णयानंतर शिवसेना नेते अनिल परब आणि ऋतुजा लटके यांनी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर शिवसेना नेते अनिल परब आणि ऋतुजा लटके यांनी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर आज त्या उमदेवार अर्ज भरणार आहे.

Team Global News Marathi: