“काँग्रेसची धुणीभांडी करणाऱ्यांनी इतक्या मोठ्या बाता करू नये”

 

मागच्या काही दिवसांपासून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे भारतीय जनता पक्षावर आणि सत्तेत बसलेल्या मोदी सरकारवर पत्रकार परिषेद तसेच सामना अग्रलेखातून टीका करताना दिसून येत आहे. त्यातच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरुन राऊत यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली होती.

आता राऊत यांनी केंद्र सरकारवर केलेल्या टिकेवरून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. ‘सत्तेसाठी स्वा. सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसची धुणीभांडी करणाऱ्यांनी इतक्या मोठ्या बाता करू नये,’ असे भातखळकर यांनी संजय राऊत यांना ट्विट करून टोला लगावला आहे.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, ‘इतके पराकोटीचे कोडगे वक्तव्य करण्यासाठी कोणत्या प्रतीचा गांजा लागतो हे राउतच सांगू शकतात. सत्तेसाठी स्वा. सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसची धुणीभांडी करणाऱ्यांनी इतक्या मोठ्या बाता करू नये,’अशी खोचक टीका अतुल भातखळकर यांनी केलीय.

Team Global News Marathi: