राज ठाकरेंना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोन म्हणाले की,

 

मुंबई | माणसे अध्यक्ष राज ठाकरे तसेच त्यांच्या मातोश्रींना काल कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. राज ठाकरे यांनीच कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली होती. तसेहच काल त्यांनी लिलावतीमध्ये जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचार सुरु केला आहे. त्यातच राज्याचे मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांचे बंधू उद्धव ठाकरे यांनी काल त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला होता.

उद्धव ठाकरेंनी राज यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्याचबरोबर राज यांच्या आई आणि बहिण जयंवती ठाकरे देशपांडे यांच्या प्रकृतीचीही विचारपूस केली. ठाकरे कुटुंबातला हा भावनिक क्षण होता. अशी माहिती खात्रीदायक सूत्राच्या माध्यमातून समोर येत आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, राज यांच्या आईंची तब्येत आता ठीक असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहे. राज ठाकरे सध्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहे. ताप कमी झाला आहे, खोकल्याचा कोणताही त्रास त्यांना नाही. श्वास घेण्यासाठीही कोणताही त्रास त्यांना जाणवत नाही. हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर आज रात्रीच त्यांना घरी सोडण्यात येणार आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांचे येत्या काही दिवसातील सर्व मेळावे, दौरे तात्पुरते स्थगित करण्यात आले आहेत. राज ठाकरे यांची प्रकृती बरी नसल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.

Team Global News Marathi: