भाजपचे स्थानिक नेते देवानंद रोचकरी व त्यांचे बंधू बाळासाहेब रोचकरी यांनी तिर्थकुंड हडपण्याचा प्रताप केला आहे या प्रकारामुळे एकाच खळबळ उडाली आहे. भाजपच्या स्थानिक नेत्याने कागदपत्राची फेराफेरी करून तिर्थकुंडावर मालकी हक्क दाखवला. द\सदर प्रकार समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार १ हजार २४४ चौरस मीटर आकाराच्या मंकावती कुंडाची महती स्कंद पुराण आणि तुळजाई महात्म्य व देविविजय पुराणात आहे.विष्णुभक्त श्री गौतम यांनी तुळजापूर येथे आल्यावर ते तिर्थकुंड बांधल्याचा दाखला दिला जातो. मात्र याच तिर्थकुंडावर भाजपचे स्थानिक नेते देवानंद रोचकरी व त्यांचे बंधू बाळासाहेब रोचकरी यांचीनजर पडली आणि त्यांने तो हडपण्याचा प्रयत्न केला.
भाजपचे स्थानिक नेते देवानंद रोचकरी व त्यांचे बंधू बाळासाहेब रोचकरी यांनी तिर्थकुंड हडपण्याचा प्रताप केलाय. थेट आई भवानीचं तिर्थकुंड हडप करुन अनेक ठिकाणी मोडतोड करुन बांधकाम केलं. बनवेगिरी व कागदपत्रात फेरफार करीत त्यांनी या तिर्थकुंडावर मालकी दाखवला आहे. भाजप नेते देवानंद रोचकरी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत.