मुंबई | नागपूर | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज नागपूर येथील कडबी चौक ते पहलवान शाह दर्गा दरम्यान नवीन रेल्वे उड्डाण पुलाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कार्यक्रमात सुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाईन माध्यमातून सहभागी झाले होते.
या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरींचे कौतुक केले. यासोबतच त्यांनी नितीन गडकरींकडे मदतीची मागणी सुद्धा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं, आजच्या या कार्यक्रमाचे… नितीन गडकरी तुमचं काय वर्णन करु.. प्रमुख पाहुणे… नितीनजींची एक वेगळी ओळख आहे. नितीनजी मी उगाचच तुमचं कौतुक करत नाही.
मला आठवतयं महाराष्ट्रात जेव्हा युतीचं सरकार आलं तेव्हा मुंबई आणि पुणे ही दोन महत्वाची शहरे महामार्गाने जोडली. या शहरांत जाण्यासाठी पाच-पाच सहा-सहा तास लागायचे जे आता दोन तासांत होत आहे. तुमच्याजागी दुसरं कुणी असतं तर म्हटलं असतं पाहतो मी कसं करता येईल पण तुम्ही ते करुन दाखवलं. आता तिच तुमची ओळख देशभरात निर्माण करत आहात अशा शब्दात कौतुक केले आहे.