फडणवीस सरकारप्रमाणे पूरग्रस्तांना भरघोस मदत करा आमदार नितेश राणे यांची मागणी !

 

कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पडलेल्या मुसळधार पावसामुळे सामान्य नागरिकाचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते, तसेच दरडी कोसळून अनेकांना आपल्या प्राणाला सुद्धा मुकावे लागले होते, याच पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारकडे भरघोस निधीची मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने २०१९ मध्ये पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्तांसाठी जशी भरघोस मदत केली होती तशीच मदत आघाडी सरकारने द्यावी,अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

त्याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी आघाडी सरकारने जाहीर केलेले ११ हजार ५०० कोटींच्या पॅकेजमधून संकटग्रस्तांच्या वाट्याला फार कमी मदत येणार आहे.
आघाडी सरकारने जाहीर केलेल्या मदतीमधील ७ हजार कोटी दीर्घकालीन उपाययोजनांसाठी तर ३ हजार कोटी पुनर्बांधणी , पुनर्वसनासाठी आहेत. ७ हजार कोटींची उपाययोजनारूपी मदत मिळण्यापूर्वी तत्काळ संकटग्रस्तांना तातडीने रोख मदतीची गरज आहे.

३१ ऑगस्ट २०१९ रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पूरग्रस्त जनतेसाठी मदतीचा जो शासन आदेश काढला होता त्याप्रमाणे मदत देणार असे आघाडी सरकारने जाहीर केले होते. मात्र,या मदतीमध्येही आघाडी सरकारने कपात केल्याचे दिसते आहे. फडणवीस सरकारने नुकसानीचे पंचनामे होण्याआधी पूरग्रस्तांना घरोघरी जाऊन ५ हजार रुपयांची रोख मदत पोहचविली होती. तसेच संकटग्रस्तांच्या बँक खात्यात १० हजार रुपये जमा केले होते.

Team Global News Marathi: