ढगाळ वातावरणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पालघर दौरा रद्द

 

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन वास्तूच्या उदघाटनप्रसंगी पालघर येथे दाखल होणार होते. मात्र खराब हवामानामुळे पालघरला जाऊ शकणार नाहीत. त्यामुळे पालघरमधील नवीन जिल्हाधिकारी इमारतीचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते आता ऑनलाईन उद्घाटन होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील बड्या सहा मंत्र्यांच्या उपस्थितीत हा सोहळा नियोजित होता. मात्र ढगाळ हवामानामुळे हेलिकॉप्टर उड्डाण कठीण असल्याने मुख्यमंत्री आता पालघर येथील सोहळ्यात प्रत्यक्ष न जाता ऑनलाईन उपस्थित राहून उद्घाटन करणार आहेत.

शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री दादा भुसे आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे पालघरमधील या सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाचा हा लोकार्पण सोहळा पार पडत आहे. एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, हसन मुश्नीफ, भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, दादा भुसे हे मंत्री आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं नियोजन आहे. मात्र आता खराब हवामानामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रत्यक्ष न जाता ऑनलाईन हजर राहतील. दुपारी 12 वाजता हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.

Team Global News Marathi: