केंद्र सरकारमुळे मराठवाड्यातील पायाभूत सुविधांचा झपाट्याने विकास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचे प्रतिपादन

केंद्र सरकारच्या विविध योजनांमुळे मराठवाड्यातील महामार्ग, रेल्वे व अन्य पायाभूत सोयी-सुविधांचा झपाट्याने विकास झाला, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी बुधवारी हिंगोली येथे पत्रकार परिषदेत केले.यावेळी आ. तानाजी मुटकुळे, यात्रा संयोजक मनोज पांगारकर, सह-संयोजक प्रविण घुगे, माजी आमदार गजानन घुगे, गणेश हाके आदी उपस्थित होते.

डॉ. कराड म्हणाले की, गेल्या सात वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार राबवित असलेल्या कल्याणकारी योजनांमुळे मराठवाड्यातील सर्व समाजाचा विकास होत असल्याचे सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे. मराठवाड्यातील पायाभूत सोयी – सुविधांच्या विकासाची गती वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांसह शेतकरी बांधव ही समाधानी आहे.

पुढे बोलताना कराड म्हणाले की, लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षे काम केले असून जनसेवेचे धडे त्यांच्याकडुन मिळाले आहेत. आता मिळालेल्या नव्या जबाबदारीच्या माध्यमातून समाजातील शेतकरी बांधव, वंचित, दुर्बल बांधवांच्या कल्याणासाठी अधिकाधिक कार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Team Global News Marathi: