‘चहापेक्षा किटली गरम’ गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंना सुनावलं

राज्याच्या राजकारणात अनपेक्षित बदल झाले असून शिवसेनेत उभी फूट पडली अन् शिंदे गटानं उद्धव ठाकरेंविरोधात बंड केलं. जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांची नावं समोर आली तेव्हा अनेक आश्चर्यकारक नावं समोर आली त्यातलंच एक नाव म्हणजे गुलाबराव पाटील… ज्या गुलाबराव पाटलांनी कायम शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडली. त्याच गुलाबराव पाटलांनी एकनाथ शिंदेंच्या सावलीत जाताच शिवसेनेवर आणि विशेषत: आदित्य ठाकरे यांच्यावर कठोर शब्दात टीका केली.

चहापेक्षा किटली गरम, असं म्हणत त्यांनी गुलाबराव पाटलांना टोला लगावला. चार लोकांच्या कंडोळ्यानं उद्धव साहेबांना बावळट केलं, चार मतं घ्यायची लायकी नाही याची आणि आम्हाला डुक्कर बोलतात, हे कोण सहन करणार आहे!, असंही गुलाबराव पाटील म्हणालेत. “आम्ही बंड केलं नाही. आम्ही उठाव केला आहे. आम्ही बंड बिलकूल केलं नाही. हिंदुत्वाच्या विचाराशी फारकत होऊ नये म्हणून आम्ही हे केलं. गुलाबराव तुला टपरीवर पाठवील.

तसंच धिरूभाई अंबानी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायचे हा इतिहास आहे. मुख्यमंत्रीही रिक्षा चालवायचे हा इतिहास आहे. ज्याला काही काम नव्हतं अशा नेतृत्वाला बाळासाहेबांनी निवडून आणलं. आमच्या प्रारब्धात बाळासाहेबांनी लिहिलं एक दिवस तुम्ही आमदार व्हा. आम्ही शिवसेना सोडली नाही. त्यामुळे आमच्या निवडून येण्याची चिंता काळजी करू नका.

आमच्या पेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहे. ५५ आमदारावरून ४० आमदार कसे काय फुटताहेत. ४० आमदार जेव्हा फुटतात ही काही आजची आग नाही. आमचं घर सोडून येम्याची इच्छा नाही. बाळासाहेबांना दुख देण्याची इच्छा नाही. त्यांच्या मुलाला दुख देण्याची इच्छा नाही. टी बाळू म्हणणाऱ्यांसोबत बसावे लागले तुमच्यामुळे”, असं गुलाबराव पाटील म्हणालेत.

Team Global News Marathi: