पुढच्या निवडणुकीत २०० आमदार निवडून आणणार, हे सरकार बाळासाहेबांच्याच विचारांचं

 

सरकार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या सरकारला आशीर्वाद दिले आहेत.कोणतीही कमतरता पडू देणार नाही, असे मोदींनी सांगितल्याने त्यांनी सांगितले. या सरकारच्या पाठिशी अमित शाहा हे डोंगराप्रमाणे उभे आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

तसेच पुढच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाचे २०० आमदार निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. हे सरकार सूडबुद्धीने काम करणार नाही. घेतलेले निर्णय मागे घेणार नाही. राज्यातील सामान्य माणसांचे प्रश्न सुटतील, असे सरकार देऊ असे त्यांनी सांगितले. विधानसभा सभागृहात विश्वासदर्शक ठरावाच्या अभिनंदन प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जबरदस्त भाषण केले.

तसेच शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढे नेत आहेत, असेही त्यांनी सांगितले. मविआत वाईट वागणूक मिळाली. खच्चीकरण केलं म्हणून उठाव केल. गद्दारी केली नाही, तर उठाव केला आहे आम्ही. म्हणून एक दिवस ठरवून बाहेर पडलो. मुख्यमंत्र्यांपासून सर्वांचे मला फोन होते. कुठे चाललात, म्हटलं मला माहिती नाही. एकाही आमदाराने म्हटलं नाही, मुख्यमंत्र्यांना भेटून जाऊया, हा एका दिवसाचा कार्यक्रम नाही. मग मी ठरवलं लढून शहीद झालो तरी चालेल मात्र मागे हटणार नाही.

मी आमदारांना सांगितलं होतं काळजी करू नका, मी तुमचं भवितव्य सुरक्षित करेन आणि जगाचा निरोप घेईन असे मी सांगितलं. ही काय छोटीमोठी घटना नाही. एक ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवकही जात नाही. हे का झालं याचा अभ्यास करायला हवा होता. एकिकडे चर्चा करायचे दुसरीकडे काढून टाकायचे माझ्या घरावर दगड मारायचे आदेश दिले असे सुद्धा शिंदे यांनी बोलून दाखविले.

Team Global News Marathi: