मुंबई पोलिसाना धक्का, सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआय करणार….!

मुंबई पोलिसाना धक्का, सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआय करणार….!

ग्लोबल न्यूज: सिने अभिनेता सुशांत सिह राजपूत प्रकरणाच्या तपासावरून मुंबई आणि बिहार पोलिसांमध्ये शीतयुद्ध पाहायला मिळले होते. त्यात महाराष्ट्राचे राजकारण सुद्धा चांगले तापले होते. त्यातच आता सुशांत प्रकरणाचा तपस मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे देण्याचा निर्णय महत्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. या निर्णयामुळे हे मुंबई पोलिसांचे मोठे अपयश मानले जात आहे.

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची बिहार सरकारची भूमिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी कायम ठेवली आहे. वडिलांच्या तक्रारीवरुन सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येसंदर्भात एफआयआर नोंदवण्याचा बिहार पोलिसांना हक्क असल्याचे न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांच्या एकल खंडपीठाने म्हटले आणि चौकशी सीबीआयला देण्याचे मान्य केले.

सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र पोलिसांना खटल्याच्या फाइल्स सीबीआयकडे सोपवण्याचे आणि आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई पोलीस सक्षम असल्याचे सांगत महाराष्ट्र सरकारनेही हा तपास सीबीआयकडे सोपवण्यास विरोध दर्शवला होता.

सीबीआय चौकशीचे आदेश कोर्टाने दिले आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी त्याचे पालन केले पाहिजे आणि मदत केली पाहिजे” असे खंडपीठाने म्हटले. अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूसंदर्भात भविष्यात नोंदवण्यात येणाऱ्या इतर कोणत्याही प्रकरणांचीही चौकशी करण्याचे निर्देशही कोर्टाने सीबीआयला दिले आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: