राजीनामा देऊन समाजावर असलेले प्रेम दाखवून द्या, निलेश राणे यांचे वडेट्टीवारांना आव्हान |

 

मुंबई | लोणावळ्यात आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी चिंतन शिबिरात बोलताना काँग्रेस नेते आणि मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महसूल मंत्रिपदाबाबतची नाराजी व्यक्त केली होती. ‘मी ओबीसी मंत्रालयासाठी निधी मागितला. तर सरकार तिजोरीत पैसे नसल्याचे सांगत आहेत.

 

आपण सर्व एकत्र नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. मी विरोधी पक्षनेता होतो. त्यामुळे महसूल विभागासारखं महत्त्वाचं खातं मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र मिळालं ओबीसी मंत्रालय,’ असं वडेट्टीवार म्हणाले होते. त्यावर आता भारतीय पूजनात पक्षाचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

महसूल खातं मिळालं नाही ही खंत वडेट्टीवारांची असेल तर महाविकास आघाडी ओबीसी समाजाच्या विरोधात आहे असा अर्थ होतो. पण तरीसुद्धा तुम्ही मंत्री म्हणून त्या मंत्रिमंडळात का चिटकले आहात? राजीनामा देऊन तुम्ही खरचं समाजावर प्रेम करता हे दाखवून द्या, असे म्हणत निलेश राणे यांनी वडेट्टीवार यांना आव्हानच देऊन टाकले.

 

Team Global News Marathi: