“…पण पंजाब राज्यात भाजपचे संपूर्ण पानिपत का झाले?” संजय राऊतांचा सवाल

 

मुंबई | पाच राज्यांच्या निवडणुकांत भाजपने चार राज्ये सहज जिंकली. त्यातले उत्तर प्रदेश जिंकल्याचा जल्लोष आजही सुरूच आहे. पण सीमेवरील पंजाब राज्यात भाजपचे संपूर्ण पानिपत का झाले? त्यावर कोणीच बोलत नाही. ‘आप’ने दिल्ली ते पंजाब हातपाय पसरले. गोव्यात ते शिरले. हे चित्र काय सांगते?, असा सवाल शिवसेना पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून
करण्यात आला आहे.

काय लिहिले आहे सामना अग्रलेखात ?

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील निवडणुकांचे रणकंदन संपले आहे. पंजाब वगळता चार राज्यांत भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेवर आला. त्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन करायलाच हवे. पाच राज्यांत उत्तर प्रदेश हे सगळय़ात मोठे व महत्त्वाचे राज्य. लोकसभेच्या 81 जागा या राज्यातून निवडून जातात. या राज्यावर भाजपने पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित केले, पण समाजवादी पार्टी या वेळी 42 वरून 125 पर्यंत गेली व समाजवादी पार्टीचे शंभराच्या आसपास उमेदवार दोनशे ते पाचशे मतांच्या फरकाने पराभूत झाले.

उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 18 जागा भाजपला यामुळे गमवाव्या लागतील हे आजच्या निकालावरून स्पष्ट झाले. प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशात मोदी, शहा यांच्यापेक्षा जास्त मेहनत केली, पण त्यांना जागा जिंकता आल्या नाहीत. काँग्रेसने पंधरा जागा जिंकल्या तरी भरपूर, असे सुरुवातीपासून बोलले गेले.’

पुढे अग्रलेखात लिहिले आहे की, ‘प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या मैदानात थोडे आधीच उतरायला हवे होते. त्या खूप उशिरा आल्या, पण आज त्या जे प्रयत्न करीत आहेत त्याचा फायदा त्यांना 2024 सालात होईल. दिल्लीतील विजय सभेत पंतप्रधान मोदी यांनी जोरदार भाषण केले. 2024 च्या विजयाचा मार्ग या निकालांनी मोकळा केला असे ते म्हणाले. हे त्यांचे मत आहे. 2024 पर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून जाईल. जेथे उद्या काय घडेल हे राजकारणात सांगता येत नाही, तेथे 2024 म्हणजे फार दूरची गोष्ट झाली,’ असा खोचक टोलाही सामना अग्रलेखातून लागण्यात आला आहे.

Team Global News Marathi: