शरद पवारांचे नाव दाऊदशी जोडल्याप्रकरणी नितेश आणि निलेश राणेंवर गुन्हा दाखल

 

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे भाजप आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या अडचणी वाढण्याचे चिन्हं दिसून येत आहेत. कारण, यासंदर्भात मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नितेश राणे आणि निलेश राणें विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राणे राणे कुटुंबीयांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे.

पत्रकार परिषदेत बोलत असतांना निलेश राणे यांनी अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणारे शरद पवार नवाब मलिक यांचा राजीनामा का घेत नाहीत. काही वेगळे राजकारण आहे का? शरद पवारच महाराष्ट्रातील दाऊदचा माणूस असल्याचा संशय मला वाटतो, असे वक्तव्य केले होते. तसेच आझाद मैदानातील मोर्चादरम्यान नितेश राणेंनी देखील शरद पवारांवर टीका केली होती.

दरम्यान, मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात निलेश आणि नितेश राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी यासंदर्भात तक्रार दिली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

 

Team Global News Marathi: