बॉक्स ऑफिसवर ‘वेड’चा धुमाकूळ, तीन दिवसांत इतकी केली कमाई

 

रितेश देशमुख व जिनिलिया देशमुख यांच्या ‘वेड’ या मराठी सिनेमानं सर्वांना वेड लावलं आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रेश्नक्का वेड लावले आहे. गेल्या तीन दिवसांत रितेशच्या या सिनेमाने दमदार कमाई केली आहे.’वेड’ या सिनेमात रितेश व जिनिलिया मुख्य भूमिकेत आहेत. रितेशने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. तर रितेशच्या जोडीला अभिनेता अशोकमामा सराफ यांनी सुद्धा स्क्रीन शेअर केला आहे

 

जिनिलिया या सिनेमाची निर्माती आहे, शिवाय हा तिचा पहिला मराठी सिनेमा आहे. रिलीजआधी या सिनेमाची जोरदार चर्चा होती. सिनेमाच्या गाण्यांनीही धूम केली होती. अशात कधी एकदा हा सिनेमा रिलीज होतो, असं चाहत्यांना झालं होतं. अखेर शुक्रवारी (30 डिसेंबर) हा सिनेमा चित्रपटगृहांत धडकला आणि या सिनेमावर प्रेक्षकांच्या उड्या पडल्या. आता या सिनेमाने तीन दिवसांत केलेल्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ‘वेड’च्या कमाईचे आकडे शेअर केले आहेत. त्यानुसार, पहिल्या दिवशी या सिनेमाने 2.25 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी हा आकडा 3.25 कोटींवर आणि तिसऱ्या दिवशी 4.50 कोटींवर पोहोचला. तीनच दिवसांत या सिनेमाने एकूण 10 कोटी कमाई केली आहे. ‘वेड’च्या कमाईचे हे आकडे मराठी चित्रपटसृष्टीत नवं चैतन्य निर्माण करणारे आहेत. येत्या दिवसांत हा चित्रपट कमाईचा आणखी मोठा आकडा पार करेल, अशी आशा जाणकार व्यक्त करत आहेत.

 

Team Global News Marathi: